मेंदू-विज्ञान – तत्त्वज्ञान सामाईक सीमारेषा
शास्त्रज्ञ हो असती ज्ञाते बहुत / परि नाहीं चित्त हातां आलें – तुकाराम हे शतक मेंदू-विज्ञानाचे आहे असे मानले जाते. मेंदू-विज्ञानाने इतर ज्ञानशाखांमध्येही प्रवेश केला आहे. न्यूरोइकॉनॉमिक्स,सोशल न्यूरोसायन्स, न्यूरोसायकॅट्री, न्यूरो एथिक्स अश्या उपशाखा सुरू होत आहेत. समाजावरही मेंदू-विज्ञानाचा प्रभाव वाढता आहे. लोकविज्ञानात मेंदूवरची पुस्तके, लेख तसेच वृत्तपत्रातील मेंदूसंशोधनाच्या बातम्या वाढत्या आहेत; हे त्याचेच द्योतक आहे. …